ऑनलाईन व्यवहार करताय?...सावधानता हीच सुरक्षा...!!

Cybercrime Awareness Blog    07-Oct-2023
Total Views |

ऑनलाईन व्यवहार

अरे, चिनू मला हे फेसबुवर रिक्वेस्ट आलीए, काय करु सांग बरं...”, वसुधाताई एकटक लॅपटॉपकडे बघून चिन्मयशी बोलत होत्या.
 
आजी, घाई करु नकोस, ओळखतेस का तू यांना कोण आहे ती व्यक्ती ते बघ जरा... ”, चिन्मयने सतर्क केले.
 
वसुधाताई नुकत्याच आपल्या नातवाकडून मोबाईल आणि लॅपटॉप कसा वापरायचा ते शिकल्या होत्या. चिन्मय शिक्षणासाठी आजीकडे राहत होता. आजीलाही सोबत झाली होती. चिन्मयच्या रुटीनमुळे घरातही चैतन्य आले होते. चिन्मय आणि आजी अशी पहिल्यापासूनच मैत्रीची जोडी होती.
 
माझी बालपणीची मैत्रीण आहे, नंदा किती दिवसांनी बघतीए तीला...छान वाटतंय” वसुधाताईंनी फेसबुकवर आलेली पोस्ट आणि फ्रेंड रिक्वेस्ट आपल्या ओळखीच्या मैत्रीणीची असल्याची खात्री केली आणि चिन्मयने आजीला फ्रेंडरिक्वेस्ट एक्सेप्ट करण्याची परवानगी दिली.
 
वसुधाताईंना मग वेडच लागलं. आपल्या गावाकडील, कॉलेजच्या, नात्यातील सगळ्यांचे फोटोज आणि पोस्टस बघण्यात त्या तासनतास घालवू लागल्या.
 
एक दिवस अचानक गावाकडून फोन आला आणि महत्वाच्या कामासाठी त्यांना तातडीने गावी निघावे लागणार होते. ऑनलाईन बँकींग कसे वापरायचे आणि वेबसाईट कशी शोधायची हे चिन्मयने शिकवले होतेच. तो त्याच्या प्रोजेक्टच्या कामासाठी बाहेर गेलेला होता. वसुधाताईंनी बसचे तिकीट ऑनलाईन बुक केले आणि त्या गावी जाण्याची तयारी करु लागल्या. तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरुन त्यांना फोन आला.
 
तुमचे तिकीट बुक करतानाचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, प्लीज अकौंट डिटेल्स देता का”- समोरची व्यक्ती घाईने वसुधाताईंना सुचना देत होती.
 
गाडी चुकू नये या विचाराने त्या आपली आवरासावर करीत होत्या. तेवढ्यात हा फोन आला. आता मात्र त्या चांगल्याच गोंधळल्या.
 
“काय पाहिजे बाबा तुला??” वसुधाताई
 
आजी तुम्ही एकदम शांत व्हा...मी तुम्हाला मदत करतो. मी सांगेन ते डिटेल्स तुम्ही मला द्या. मी तुमची प्रवासाची सर्व व्यवस्था करतो.
 
त्या अनोळखी माणसाने वसुधाताईंना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.
 
बोल बाबा….काय सांगू तुला?” वसुधाताई हताशपणे म्हणाल्या.
 
तुमचे कार्डवरील डिटेल्स सांगता का म्हणजे मी तुमचे पैसे कुठे अडकलेत ते पाहतो”- तो
 
बरं...सांगते हं...माझा चष्मा लावते आधी....हं सापडला. घे लिहून”- वसुधाताई
 
तेवढ्यात लॅचचे कुलूप उघडून चिन्मय घरात आला. बँकेचे कार्ड हातात घेऊन आजी कुणाला काय सांगतीए...त्याला धक्काच बसला...
 
आजी, फोन ठेव आधी...” चिनू ओरडलाच
 
अरे पण मी पैसे भरुनही त्या बसवाल्यांना ते मिळाले नाहीत असं म्हणताहेत ते...” – वसुधाताई
 
आजी मी त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सगळं तपासून घेतो. आणि संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत नंबरवर फोनही करतो. तू काळजी करु नकोस
 
चिनूने ट्रॅव्हल कंपनीच्या अधिकृत नंबरवर फोन केला. आणि आजीचे तिकीट कन्फर्म असल्याची खात्री करु घेतली. आणि मग त्याने आजीला समजावून सांगितले.
 
आपले बँक डिटेल्या कधीही फोनवरुन कुणालीही द्यायचे नसतात. कार्डवरील नंबर आणि कार्डच्या मागे असलेला सीव्हीव्ही नंबर आणि आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी जर आपण शेअर केला तर आपल्या खात्यातील रक्कम चोरांना काढून घेता येते
 
बाप रे...माझ्याकडून अनर्थच झाला असता म्हणायचा”- वसुधाताई सावध होत म्हणाल्या.
 
बरं झालं बाबा वेळेत आलास, मोठे संकट टळले” त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
 
ऑनलाईन बँकींग व्यवहार करताना काय काळजी घ्यावी ?
 
- सुरक्षित वेबसाइट वापरा.
 
-बँकिंग व्यवहार करताना नेहमी तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. कोणत्याही फेक वेबसाइटवर जाऊ नका.
 
- सुरक्षित कनेक्टिव्हिटी वापरा. तुमचे बँकिंग व्यवहार नेहमी तुमच्या घरी किंवा ऑफिसमधील सुरक्षित वाय-फाय नेटवर्कवर करा. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा.
 
- मजबूत पासवर्ड वापरा. तुमच्या बँकिंग खात्यासाठी मजबूत पासवर्ड वापरा. तुमच्या पासवर्डमध्ये संख्या, अक्षरे आणि विशेष वर्ण यांचा समावेश करा.
 
- तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या पासवर्डला कोणीतरी कळल्यास तुमचे खाते हॅक होण्याची शक्यता असते.
 
- तुमच्या बँकेच्या ईमेल आणि एसएमएस अलर्टला सबस्क्राइब करा. तुमच्या बँकेच्या ईमेल आणि एसएमएस अलर्टला सबस्क्राइब करा. यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात कोणतेही नवीन व्यवहार झाल्यास त्याची माहिती मिळेल.
 
तुमच्या बँकेच्या सुरक्षा सूचनांचे पालन करा. तुमच्या बँकेने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करा. तुमच्या बँकेने दिलेल्या कोणत्याही नवीन सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करा.
 
याशिवाय, खालील गोष्टी देखील लक्षात ठेवा:
 
- तुमच्या बँक खात्याची नियमितपणे तपासणी करा. तुमच्या बँक खात्याची नियमितपणे तपासणी करा. तुमच्या खात्यात कोणतेही अनधिकृत व्यवहार झाले आहेत का ते तपासा.
 
- तुमच्या बँकेशी सतत संपर्कात रहा. तुमच्या बँकेशी सतत संपर्कात रहा. तुमच्याकडे कोणतीही शंका असल्यास तुमच्या बँकेशी संपर्क साधा.
 
- ऑनलाइन बँकींग व्यवहार करताना या काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या बँक खात्याचे रक्षण करू शकता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता.
 
अतिरिक्त टिप्स
 
- अपडेटेड अँटीव्हायरस आणि फायरवॉल सॉफ्टवेअर वापरा. तुमच्या संगणकावर अपडेटेड अँटीव्हायरस आणि फायरवॉल सॉफ्टवेअर वापरा. हे तुमच्या संगणकाला मालवेअर आणि हॅकिंगपासून संरक्षित करण्यात मदत करेल.
 
- अपडेटेड ब्राउझर वापरा. तुमच्या संगणकावर अपडेटेड ब्राउझर वापरा. हे तुमच्या ब्राउझरला सुरक्षा आणि स्थिरतेच्या सुधारणा पुरवेल.
 
- तुमच्या बँकिंग सेशनचा वापर पूर्ण झाल्यास बाहेर पडल्यानंतर तुमचे ब्राउझर विंडो बंद करा. तुमच्या बँकिंग खात्यावर कोणतेही विचित्र व्यवहार झाल्यास त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधा.