सुरक्षित भविष्यासाठी 'GUARD' बँक खाते

JSB SME Blog    19-Jan-2021
|
 
GUARD bank account for sa
 
कोरोना प्रतिबंधाच्या काळांत सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता आपण सर्वजण आपले व्यवहार ऑनलाईन करायला सुरुवात केली. जे आधीपासून डिजीटल सेवेचा वापर करीत होते त्यांनी ऑनलाईन बँकींगसारख्या सुविधा वापरण्यास प्राधान्याने वापरांस सुरुवात केली. बऱ्याच युवा मित्र मैत्रिणींनी स्वयंस्फुर्तीने या डिजीटल जगाची ओळख ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना करुन दिली. न्यु नॉर्मलकडे जातांना अनेक आव्हानांचा नव्याने विचार केला जात आहे. पण याबरोबरच ऑनलाईन चोराच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते आहे. नवनविन तंत्राचा वापर करुन या फ्रॉडद्वारे नागरिकांची फसवणूक केली जाते. 
 
बँकिंगचे सर्व प्रश्न हाताळताना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. रिझर्व बँकेने या प्रश्नांचा विचार करुन ‘गार्ड’ (GUARD) या नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन सेवा सुरळीत करण्याचा रिझर्व बँकेचा प्रयत्न आहे. 
 
शहरी सहकारी बँकेती सायबर सुरक्षेसाठी रिझर्व बँकेने पाच महत्त्वपुर्ण बाबींचा समावेश असलेली सायबर सुरक्षेसाठी गार्ड (GUARD) ही प्रणाली विकसित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सहकारी बँक क्षेत्रांत सायबर सुरक्षेशी संबंधित अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींचे निरसण, शोध आणि सायबर हल्ले टाळण्याच्या उद्देशाने प्रशासकीय देखरेख, उपयुक्त तंत्रज्ञान गुंतवणूक, योग्य नियमन व देखरेख, मजबूत सहकार्य आणि आवश्यक आयटी आणि सायबरसुरक्षा कौशल्ये विकसित करणे यांचा समावेश आहे. 
 
Governance Oversight - 
 
आर्थिक व्यवस्थेची जटिलतेचे महत्त्व अधोरेखित करुन
बँकांमधील कारभाराचा दर्जा मजबूत करणे. बँकेसंदर्भातील सुशासनावर बारिक लक्ष ठेवणे. 
बँकेच्या बोर्डच्या बैठकीत सायबर सुरक्षेसंबंधित बाबी चर्चेचा भाग असणे आवश्यक आहे. या संदर्भात पुनरावलोकन करण्यासाठी बँकांना संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करावा. विशिष्ट निर्देशकांसह सायबर सुरक्षा आढावा बैठकीत समाविष्ट करण्याच्या सूचना बँकांना दिल्या जातील.
 
Utile Technology Investment - 
 
ग्राहकांना सहकारी बँकांमध्ये कोअर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस) किंवा इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि एटीएम सारख्या डिजिटल वितरण सुविधा पुरवण्यात महत्त्वपुर्ण भुमिका बजावू शकतात. माहिती तंत्रज्ञान अद्ययावत करणे आणि त्यासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी निधीची उभारणी करणे. यासाठीच्या सेवांची उपलब्धता करुन देणे. 
 
Appropriate Regulation and Supervision - 
 
सध्या अस्तित्त्वात असलेल्या सूचनांनुसार, यूसीबीला इतर संबंधित तक्रारीं व्यतिरिक्त सर्व असामान्य सायबर सुरक्षा घटनेबद्दल (ते यशस्वी झाले किंवा केवळ प्रयत्न असो) त्वरित अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या घटनांचा अभ्यास करुन भविष्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व सहकारी बँकांचे एकसमान ‘सायबर सुरक्षा नियमावली’ कागदपत्र जारी केले जाईल. या दस्तऐवजात वेबसाईटला एक्सेस देण्याचे व्यवस्थापन, नेटवर्क विभाजन, सुरक्षित कॉन्फिगरेशन, सुरक्षा घटना आणि इव्हेंट मॅनेजमेन्ट यासह लागू केलेल्या नियंत्रणे लागू करण्यासाठी संदर्भ दस्तऐवज म्हणून यूसीबीद्वारे वापरल्या जाणार्‍या वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्यवेक्षी संस्थांमधील विविध सर्वोत्तम पद्धतींचा समावेश केला जाईल.
 
Referance: bit.ly/3oSMn61