2023-24 चा अर्थसंकल्प : अमृतमहोत्सवी पर्वाची वाटचाल

JSB SME Blog    13-Feb-2023
|
 
अर्थसंकल्प - Union Budget
 
आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प (Union Budget) केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (nirmala Sitharaman) यांनी नुकताच सादर केला. हा अर्थसंकल्प (Union Budget) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबवत अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला खूप अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. अमृतकालमध्ये तंत्रज्ञानावर आणि ज्ञानावर आधारीत अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देताना सार्वजनिक वित्त आणि मजबूत आर्थिक क्षेत्रांचा यात समावेश प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.
 
या अर्थसंकल्पात तीन घटकांचा विचार करण्यात आला आहे. पहिला घटक म्हणजे नागरिक ; यामध्ये विशेषत: तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध देणे तर दुसरा घटक म्हणजे वाढ आणि रोजगार निर्मितीला मजबूत प्रोत्साहन देणे आणि तिसरा घटक म्हणजे लघु उद्योगांना चालना देवून आर्थिक स्थिरता मजबूत करणे. अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जी डी पी दर सुमारे ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्सची स्थापना केली जाणार आहे. जगभरात तृणधान्याचे महत्त्व पटवून भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.
 
८१ लाख बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मदत करण्यात आली आहे आणि ती आणखी वाढवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 
कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, शेती स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे.
 
केंद्रीय अर्थसंकल्पात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भरड धान्य अर्थात मिलेट्सचे उत्पादन, विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. भरड धान्यांचा उल्लेख त्यांनी “ श्री अन्न “ असा केला. हैदराबाद इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स स्थापन करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.
 
या आर्थिक वर्षात खालील 7 घटकांना प्राथमिकता देण्यात आली आहे.
 
1. सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे
3. पायाभूत घटक आणि गुंतवणूक
4. क्षमतांना प्रोत्साहित करणे
5. हरित विकास
6. युवा शक्ती
7. आर्थिक क्षेत्र
 
 
महिला सन्मान बचतवर पत्र जारी होणार –
 
अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत पत्र जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा कालावधी दोन वर्षांचा असेल. या अंतर्गत महिला किंवा बालिकेच्या नावावर दोन वर्षांसाठी दोन लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
 
ज्येष्ठ नागरिकांच्या एफ डी अर्थात मुदत ठेवीसाठी नवीन योजना 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत क्षमता वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये सुविधा दिल्या जाणार आहेत.
 
  • 2025-26 आधी वित्तीय तूट जी डी पी च्या 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांवर वाढवण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे.
  • महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जाणार असून दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये 2 लाख रुपये एखाद्या महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असेल. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार आहे.
 
शिक्षक प्रशिक्षणासाठी जिल्हा पातळीवर संस्थेचा विकास, लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाणार असून यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट - चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट यांच्याकडून प्रादेशिक भाषा आणि इंग्लिश भाषेमधील शिक्षणेतर पुस्तके या ग्रंथालयांना दिली जाणार असून आर्थिक साक्षरतेसाठी विविध वयोगटांनुसारची पुस्तकेदेखील या ग्रंथालयांना पुरवली जाणार आहेत.