MSME…अर्थव्यवस्थेच्या मार्गावरील एक विकासचक्र

JSB SME Blog    27-Jun-2024
|

jsb  
 
विमल मुंबईपासून २५० किलोमीटरवर असलेल्या एका गावातील महिला. नवरा, दोन मुली आणि सासूबाई असे कुटुंब. काही दिवसांपूर्वीच आबांचे म्हणजे सासऱ्यांचे निधन झाले होते. विमलचे पती आणि त्यांचे तीन भाऊ असा परिवार होता. आबांच्या निधनानंतर जमिनीचे तुकडे झाल्याने विमलच्या कुटुंबातील उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला होता. विमलचे पती शेती करत होते. इतर भाऊ व्यवसाय आणि नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावले होते. २ जणांनी पैशांच्या अडचणीअभावी आपली जमीन विकली होती. त्यामुळे अल्प जमिनीवर विमल आणि तिचा पती, दुसरा एक भाऊ यांच्यासह शेतीकाम करत होते.

मुलींच्या शिक्षणासाठी विमलला पैशांची गरज होती. काय करावे याचा विचार करत असताना आज आशाताईंची भेट झाली. आशाताई गावातील बचतगटाच्या प्रमुख होत्या. विमलचे आणि त्यांचे माहेरचे गाव एकच असल्याने दोघींची चांगलीच मैत्री होती.
घडलेल्या सर्व घटना माहित असल्यामुळे विमलला समजून घेण्यात आशाताईंना अजिबात वेळ लागला नाही. आज त्या विमलला मदतीचा हातच घेऊन आल्या होत्या.

विमलची आई खूप सुरेख आणि अतिशय रेखीव अशा विविध कापडांच्या डिझाईन करुन गोधड्या शिवत असे, विमल लहानपणापासूनच आपल्या आईला मदत करत होती त्यामुळे हा गुण तिच्याकडेही आला होता.
 
बचतगटाचे मोठे प्रदर्शन तालुक्याच्या गावी भरवले जाणार होते. यामध्ये आशाताईंनाही सहभागी होण्याचे निमंत्रण आले होते. आपल्या गावातील सुप्त गुण असलेल्या महिलांना संधी देण्याचा संकल्प केला होता. या पार्श्वभूमीवर आशाताईंनी विमलला विविध नक्षीकाम असलेल्या गोधडी तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. कच्च्या मालासाठी एका कापडाच्या व्यापाऱ्यांशी तिची गाठ घालून दिली. त्यांच्याकडून थोडासा डिफेक्ट असलेल्या साड्या आणून विमलने गोधड्या शिवायला सुरुवात केली. प्रदर्शनात सहभागी झाली. पहिल्या दिवसापासून विमलच्या गोधड्यांना भरपूर मागणी आली.
 
या प्रदर्शनाचे आयोजक जनता सहकारी बँक लि., पुणे होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग काय आहे याबद्दल माहिती दिली. बँकेच्यावतीने आशाताई आणि त्यांच्या बचतगटाला MSME कर्ज योजनेबद्दल माहिती दिली.
 
 
जनता बँक MSME कर्ज योजना
  • कर्ज मर्यादा – रु. २५ लाखापेक्षा जास्त ते रु. ५ कोटीपर्यंत

  • कालावधी – ५ ते ७ वर्ष

  • व्याजदर – नवीन व्यवसाय असल्यास – 9.75%

  • जुन्या व्यवसायाची वृध्दीसाठी – 9.50%

  • रु. १ कोटीपर्यंत जोडतारण नाही

MSME काय आहे?
 
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) हे भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहेत. MSME च्या फायद्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
 
MSME चे फायदे
 
1. रोजगार निर्मिती: मोठ्या उद्योगांपेक्षा कमी गुंतवणुकीत अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता MSME मध्ये असते.
 
2. स्थानीय विकास: MSME क्षेत्रामध्ये स्थानिक कच्च्या मालाचा वापर होतो आणि स्थानिक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागांचा विकास होतो.
 
3. नवीन उद्योजकतेला चालना: कमी गुंतवणुकीसह व्यवसाय सुरू करण्याची संधी MSME मध्ये मिळते, ज्यामुळे नवीन उद्योजक तयार होतात.
 
4. निर्यात वाढ: MSME क्षेत्रात निर्मित माल निर्यात करून देशाच्या निर्यातीत वाढ होऊ शकते.
 
5. तंत्रज्ञानाचा वापर: MSME क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रिया सुधारली जाते, ज्यामुळे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते.
 
भारतातील संधी
 
भारतामध्ये MSME क्षेत्रासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत:
 
1. कृषी आधारित उद्योग: कृषी उत्पन्नावर आधारित उद्योगांना मोठी संधी आहे. फूड प्रोसेसिंग, डेअरी उत्पादन, हर्बल प्रोडक्ट्स यांसारख्या उद्योगांना मोठी मागणी आहे.
 
2. हस्तकला आणि हँडीक्राफ्ट्स: भारतातील विविध प्रांतांतील हस्तकला आणि हँडीक्राफ्ट्स यांना जागतिक बाजारात चांगली मागणी आहे.
 
3. पर्यटन आणि आतिथ्य उद्योग: पर्यटन क्षेत्रात सेवा पुरवण्याचे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात. छोटे गेस्ट हाऊस, टूर गाईड सेवा, ट्रॅव्हल एजन्सी यांसारख्या व्यवसायांना मोठी संधी आहे.
 
4. तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स: तंत्रज्ञान आधारित उद्योग, विशेषतः IT आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.
 
5. आरोग्य सेवा: आरोग्य सेवा क्षेत्रात लहान हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, औषध दुकाने आणि आरोग्य सेवा प्रदान करणे यासारख्या व्यवसायांना मोठी संधी आहे.
 
सरकारी योजनांचा लाभ
 
भारत सरकारने MSME क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री रोजगार योजना यांचा समावेश आहे. या योजनांमुळे MSME क्षेत्राला आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, आणि विपणनाच्या संधी उपलब्ध होतात.
 
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small & Medium Enterprises-MSME) विभाग हा गेल्या 15-16 वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात सक्रिय आणि गतिमान विभाग मानला जातो. मोठमोठ्या उद्योगांच्या तुलनेत कमी भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात एमएसएमई (MSME) या विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे ग्रामीण आणि मागास भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्याचे काम केले आहे. गेल्या 15 वर्षात या MSMEच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम झाले आहे. या क्षेत्राचा देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठा वाटा आहे.
 
बऱ्याचवेळा मोठमोठ्या कंपन्या अनेक महत्त्वाचे पार्ट्स एमएसएमई उद्योगांमधून करून घेत असतात. यामुळे देशातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
 
या योजनांच्या साहाय्याने या क्षेत्रात तुम्हीदेखील तुमच्या व्यवसायाला गती देऊ शकता आणि भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावू शकता.