जनता सहकारी बँक व ग्राहक पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशाला गरज एका अर्थक्रांती’ची या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अर्थतज्ज्ञ श्री. अनिल बोकील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी जनता बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, ग्राहक पेठेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. सूर्यकांत पाठक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅदग्रीकल्चरचे कोषाध्यक्ष श्री. चंद्रशेखर चितळे, पुणे सराफा
असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फत्तेचंद रांका, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फॅम) श्री. राजेश शहा, ज्येष्ठ पत्रकार श्री. यमाजी मालकर, श्री. रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री. खळदकर यांच्या हस्ते श्री. बोकील यांचा शाल, श्रीफळ व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमाचे वृत्त, तसेच श्री. बोकील यांनी विमुद्रीकरणाबाबत मांडलेले मुद्दे काही निवडक व्हिडिओमधूनही आम्ही न्यूजलेटरच्या माध्यमातून आपणासमोर सादर करीत आहोत.
https://www.youtube.com/watch?v=SB0TyYTZskU
|