आजपर्यंत जनता सहकारी बँकेने तब्बल 66 नवीन वर्षांचे स्वागत नेहमीच मोठ्या दिमाखात केले. पण दरवर्षीपेक्षा यंदाचे नवीन वर्ष नक्कीच आपले वेगळेपण जपणारे आहे, त्याचप्रमाणे इतिहासाला आपली दखल घ्यायला लावणारे आहे. गतवर्षातील नोव्हेंबर महिन्यात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनपेक्षित निर्णय घेतला आणि त्याच निर्णयाच्या सोबतीने आज आपण नवीन वर्षात पदार्पण केले आहे. 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करताना एक नवी अर्थव्यवस्था आम्ही अंगिकारत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. |
||||
तसं बघायला गेलं तर मा. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णया अगोदरपासूनच जनता बँक ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी आग्रही भूमिका घेत आलेला आहोत. त्यासाठी आम्ही ‘जनता बँक मोबाईल अॅसप’ देखील सुरू केले आहे. या नव्या वर्षात जनता बँक मोबाईल अॅीपद्वारे अधिकाधिक व्यवहार ग्राहकांमार्फत करून घेण्यासाठी आम्ही पुढील काळात प्रयत्नशील राहू. ‘कॅशलेस’च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला या वर्षात एक नवी कलाटणी मिळणार आहे. या ऐतिहासिक घटनेचा सहकारी क्षेत्रातील आपण एक अग्रगण्य भाग असल्याचे समाधान आम्हाला आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीशिवाय दरवर्षीपेक्षा हे वर्ष यामुळे वेगळे आहे की, यंदा प्रथमच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पातूनही अनेक नवीन आणि सामान्यांच्या हिताच्या योजना पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्विभूमीवर जनता सहकारी बँक पुढील वर्षातील योजनांबाबत नव्याने विचार करीत असून त्याबाबतची माहिती लवकरच आपल्यासमोर मांडू. |
||||
|
||||
|
||||
|