समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने १८ ऑक्टोबर १९४९ रोजी जनता सहकारी बँकेची स्थापना झाली. ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सहा दशकांहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली बँक म्हणून आज जनता सहकारी बँकेची जनमानसात ओळख आहे. सन १९८८ मध्ये बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला तर मार्च २०१२ साली बँक मल्टिस्टेट म्हणून ओळखली जाऊ लागली. सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून जनता सहकारी बँकेने आपला नावलौकिक निर्माण केला आहे. आजमितीस बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात ६७ शाखा कार्यरत असून बँकेची एकूण उलाढाल रुपये १३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. |
||||
या न्यूजलेटरचा संवाद एकतर्फी व्हायला नको यासाठी तुमचा सहभाग त्यात असणे अत्यंत आवश्यक आहे. आजपर्यंतच्या ६७ वर्षांच्या प्रवासात तुमची मोलाची साथ मिळाली, तुम्ही अतुट विश्वारस आमच्यावर दाखविलात आणि आम्हीही नेहमी तुमच्या अपेक्षापुर्तींच्या जवळ जाण्याचाच प्रयत्न केला. पण तरीही आपल्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी तुम्ही बँकेकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा feedback@janatabankpune.com या मेल आयडीवर पाठवाव्यात. त्या अपेक्षा सर्वतोपरी पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू...
|
||||
|
||||
|
||||
|
||||
|