View as a Web page | ||||
सभासदांना 10 टक्के लाभांशाची शिफारस
सहकारी बॅंकिंग क्षेत्रात दमदार वाटचाल करणा-या जनता सहकारी बॅंकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (सन 2015-2016) रूपये 64.97 कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला असून बॅंकेची एकूण उलाढाल ( बिझनेस मिक्स) रूपये 12 हजार 805.05 कोटी रूपयांवर पोचली आहे. वरील आर्थिक वर्षासाठी सभासदांना 10 टक्के लाभांशाची शिफारस करण्यात आली. अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर यांनी आज येथे दिली... |
||||
|
||||
महापालिका आयुक्त कुणाल कुमार
जनता सहकारी बँक पुणेच्या सहकार्याने सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लिहिलेल्या दहावी नंतरची शाखा निवड या पुस्तकाचे प्रकाशन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी विवेक वेलणकर, जनता सहकारी बँकेच्या नियोजन विभागाचे प्रमुख राधाकृष्ण लिमये, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ (माध्यमिक) प्रमुख - शाम दौंडकर, बँकेचे उपाध्यक्ष संजय लेले आदी मान्यवर उपस्थित होते... |
||||
आपल्या हक्काचं घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असते. मग त्यातून सेलिब्रेटींना देखील वगळता येणार नाही. ग्राहककेंद्रित योजनांवर अधिक चांगल्या पद्धतीने काम करून घरखरेदीसाठी, फर्निचरसाठी अधिकाधिक ग्राहकांना घरकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँक नेहमी प्रयत्नशील असते. अशा प्रयत्नांमधूनच नामांकित ग्राहकांना जनता बँक परिवारात सहभागी करून घेण्याची संधी मिळते आहे. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांनी त्यांच्या डोंबिवलीतील नवीन घराच्या खरेदीसाठी जनता बँकेकडून घरकर्ज घेतले. त्याचा धनादेश स्वप्निल जोशी यांना प्रदान करण्यात आला. |
||||
|
||||
|