चौंडेश्वरी बँकेचे जनता सहकारी बँकेत ४ जुलै २०१६ रोजी ९ शाखा व एका विस्तारित कक्षासह विलीनीकरण झाले. त्याचा औपचारिक विलिनीकरण सोहळा शनिवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे संपन्न झाला. यानिमित्ताने बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, उपाध्यक्ष श्री. संजय लेले आणि संचालक श्री. जगदीश कदम यांनी बँकेची भूमिका व भविष्यातील वाटचालीविषयी ग्राहक, सभासद, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला |